Homeक्राईमआला थंडीचा महिना ,चोऱ्यांचे सत्र काही थांबेना...एटीएम,मंगळसूत्रचोरी,घरफोडी ,जबरी लुटीच्या घटनेमुळे जिल्हा हादरला

आला थंडीचा महिना ,चोऱ्यांचे सत्र काही थांबेना…एटीएम,मंगळसूत्रचोरी,घरफोडी ,जबरी लुटीच्या घटनेमुळे जिल्हा हादरला

advertisement

अहमदनगर – दि. १५ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यात सध्या एटीएम चोरट्यांनी मंगळसूत्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील आठवड्यातच अकोला येथे थेट स्फोटक वापरून चोरट्यांनी एटीएम मशीन फोडले होते. त्याप्रमाणे अवघ्या काही मिनिटातच पारनेर तालुक्यातील जवळा येथील एटीएम माशीनसह रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अहमनगर शहरातही मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास एका पेट्रोल पंप चालकाला लुटल्याची घटना दिली असून.मंगळसूत्र चोरांनी पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे.,गुलमोहर रोडवरील पारिजातक चौकात सोमवारी संध्याकाळी सात वाजता एका महिलेच्या गळ्यातील चोरल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी फिरायला जाणाऱ्या एका महिलेला खाली पाडून तिचे मंगळसूत्र चोरल्याची घटना आगरकर मळा भागात घडली आहे. यामुळे पोलिसांसमोर चोऱ्या रोखणे एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे. पारनेर तालुक्यातील जवळा येथील मुलीच्या खून प्रकरणाचा तपास अद्याप लागला नसून जवळे ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्यामध्ये आता या ठिकाणी एटीएम चोरट्यांनी डल्ला मारून एटीएम मशीन चोरून गेल्यामुळे जवळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. एकीकडे स्थानिक गुन्हे शाखा फरारी आरोपी तसेच मोठमोठ्या गुन्ह्यातील आरोपी पकडत असताना स्थानिक पोलिस काय करतात हा प्रश्न आता निर्माण होते एकट्या स्थानिक गुन्हे शाखेची मागील वर्षाची कामगिरी पाहता जिल्ह्यातील स्थानिक पोलीस स्टेशनची कामगिरी त्या पुढे एकदम फिकी पडेल अशी आहे.त्यामुळे आता स्थानिक पोलिसांनी लक्ष घालून तपास करणे गरजेचे आहे आणि आपल्या हद्दीतील चोऱ्या कशा रोखता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular