अहमदनगर दि.८ मार्च
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अहमदनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मराठा समाजाचा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एका कार्यक्रमानिमित्त येणार आहेत.
त्यांना विरोध करण्यासाठी जमलेल्या मराठा कार्यकर्त्यांना अहमदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावे या मागणी करता आणि मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध म्हणून मराठा समाजाचे कार्यकर्ते नारायण राणेंना काळे झेंडे दाखवणार होते
नारायण राणे येण्या अगोदरच पोलिसांनी पोलीस मुख्यालया समोर जमा झलेल्याला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे