गडचिरोली प्रतिनिधी
शनिवारी सकाळी पोलीस आणि नक्षल्यावाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली असून या भीषण चकमकीत पोलिसांना 26 नक्षल्यवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकी दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूरला हलवण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या मृताचा आकडा वाढण्याची शक्यता असून हे पोलिसांचे एक मोठं यश आहे गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती –कोटगुल घनदाट जंगल परिसरात शनिवारी सकाळी पोलीस-नक्षलमध्ये चकमक उडाली होती .