अहमदनगर दि.१९ डिसेंबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ क च्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी पाच वाजता संपली आहे. प्रभाग मोठा असल्याने उमेदवारांची धावपळ होताना दिसली. आज सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार संपला असला तरी उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरूच ठेवल्या आहेत. निवडणुकी साठी आजची आणि उद्याची रात्र महत्त्वाची आहे. त्यामुळे एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी सर्वच कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
सोशल मीडियावर सध्या लक्ष्मी दर्शनाचे भावच फिरत असल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. पोट निवडणूक मध्ये मतदानाची टक्केवारी नेहमीच कमी होत असते त्यामुळे आपल्या हक्काचे मतदान बाहेर काढणे हे मोठे जिकिरीचे काम उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. या प्रभागात एकूण सहा उमेदवार असताना एका अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन माघार घेतली त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार असून भारतीय जनता पार्टीचे प्रदीप परदेशी ,महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोपट पाथरे आणि अन्य दोन अपक्ष उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत या प्रभागात १८ हजार ३०१४ मतदार असून मतदाना नंतरच मतदानाची टक्केवारी सांगेल कोणता उमेदवार विजय खेचून आणेल सध्यातरी या प्रभागात रात्रीचा खेळ सुरू झाला असून कोणाला किती कुठे द्यायचे कोणाकडून काय घ्यायचे याबाबतचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे मतदारांनाही या रात्रीस खेळ चालेच्या कार्यक्रमाला सुरुवात कधी होते याची उत्सुकता लागून आहे.