Homeक्राईमपोलिसांनी पोलिसाला पोलीस स्टेशनच्या आवारात डिझेल चोरी करताना रंगेहात पकडले

पोलिसांनी पोलिसाला पोलीस स्टेशनच्या आवारात डिझेल चोरी करताना रंगेहात पकडले

advertisement

पाथर्डी : दि. ११ फेब्रुवारी-

पोलिस ठाण्याच्या परिसरात जप्त करून ठेवलेल्या एका टँकर मधून बायोडिझेल चोरी करताना थेट पोलिसाला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

या बाबत हकीकत अशी की जानेवारी महिन्यात दोन बायोडिझेल टँकरवर पोलिसांनी कारवाई करत टँकर जप्त केले होते हे टँकर पाथर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करण्यात आले आहेत.गुरुवारी पहाटेच्या दरम्यान पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या ठाणे अमंलदार पोलिस नाईक ईश्वर रघुनाथ गर्जे आणि पोलीस कर्मचारी किरण बडे यांना पोलीस स्टेशन च्या आवारातून काही आवाज ऐकू आला एवढ्या पहाटे पोलिस स्टेशनच्या आवारात काय आवाज येतो हे पाहण्यासाठी दोघे आवाजाचा कानोसा घेत परिसराच्या चक्कर मारत असताना पोलिस ठाण्याच्या आवारात लाईट बंद करून जप्त केलेल्या टँकर शेजारी अजून एक टँकर उभा असलेला दिसला व जप्त केलेले टँकर मधून मशीनच्या साहाय्याने बायोडिझेल त्या टँकरमध्ये चोरी करून भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

गर्जे यांनी यावेळी त्या ठिकाणी असलेल्या तीन अज्ञात इसमांना याबाबत विचारले असता त्यांनी इश्वर गर्जे आणि किरण बडे यांना धक्काबुक्की करून पळण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यापैकी एकाला पोलिसांनी ओळखले असल्याने पोलिसांनी याकृत्यामधे सहभागी असणा-या एका पोलिस नाईक असणाऱ्या भागवत चेमटे व दिपक शेंडे यांना ताब्यात घेतले आहे.तर इतर तीन जण फरार झाले आहेत.

या सर्वांवर पोलीस ठाण्याच्या आवारातून जप्त केलेल्या टँकरमधील बायोडिझेल चोरणे सरकारी कामात अडथळा आणणे धमकी देणे आशा विविध करणाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात असिफ रफिक शेख रा.पाथर्डी, दिपक आरोळे (पुर्ण नाव माहीत नाही) हे दोघे जण फरार आहेत.

ही घटना घडल्यानंतर आज संपूर्ण पाथर्डी शहरात या घटनेबाबत चांगलीच खमंग चर्चा सुरू आहेत थेट पोलिसच या गुन्ह्यात आरोपी झाल्याने कुंपणच शेत खात असल्याने विश्वास कोणावर ठेवायचा अशी उपरोधिक चर्चाही पाथर्डीत सुर आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular