मुंबई : अहमदनगर शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अनंतराव गारदे यांची निवड करण्यात आली आहे. तशी घोषणा मुंबईत ओबीसी काँग्रेस विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी काँग्रेस विभागाच्या राज्य मेळाव्यामध्ये टिळक भवन येथे केली आहे. माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुनील देशमुख, पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चौधरी, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींसह काँग्रेसचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.नियुक्तीचे पत्र विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गारदे यांना प्रदान करण्यात आले आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी गारदे यांच्या नावाची शिफारस प्रदेश काँग्रेसकडे केली होती. त्यामुळे त्यांची या पदावर वर्णी लागली आहे. गारदे हे ओबीसी नेते असून माळी समाजाचे आहेत. नगर शहरामध्ये माळी समाज हा मोठ्या संख्येने आहे. काळे यांनी काँग्रेस ओबीसी विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी गारदे यांच्या माध्यमातून शहरातील माळी समाजाला अध्यक्षपदाची संधी दिल्यामुळे माळी समजामधून गारदे यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.
या विभागाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत. नगर शहरामध्ये गारदे यांना पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून त्यांच्या ते नगर शहरातील ओबीसींना एकत्रित करण्याचे काम किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे करतील असा मला विश्वास आहे.
किरण काळे म्हणाले की, ओबीसी घटकांचे अनेक प्रश्न आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व नगर शहरातील ओबीसी घटकांना न्याय देण्याचेसाठी अनंतराव गारदे नगर शहरातील ओबीसींना संघटित करून त्यांच्या हक्कासाठी लढण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून करतील असं मला विश्वास आहे. त्यांना पक्षाच्या माध्यमातून पूर्ण बळ देण्याचे काम केले जाईल.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अनंतराव गारदे म्हणाले की, मी गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय चळवळीत काम करत आहे. मात्र किरण काळे यांनी माझ्यावरती विश्वास दाखवत मला आणि माळी समाजाला काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची दिलेल्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न दिलेल्या मी करणार आहे. नगर शहरातील ओबीसी मधील सर्व जातीच्या प्रतिनिधींना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. गारदे यांच्या निवडीचे शहरातील सर्व घटकांकडून सर्वत्र स्वागत होत आहे.