शिर्डी दि २६ डिसेंबर
शिर्डी देवस्थानने साई दर्शनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे.आज पासून भाविकांना रात्री दर्शन घेता येणार नाही. साईबाबांचे मंदिर रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत बंद राहणार आहे.Omicron मुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याने रात्री मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंतच साई मंदिर खुले राहणार आहे.काकड आरती आणि शेज आरती देखील मंदिराच्या पुजाऱ्यांच्या उपस्थीत होणार आहे.रात्री ९ नंतर मंदिर बंद असल्याने मंदिराचे प्रसादालायही बंद राहणार आहे. भाविकांनी जास्त गर्दी करू नये असे आवहान साई संस्थेचे अधिकारी भाग्यश्री बगाटे यांनी केले आहे.