पारनेर –
पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. . यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आ. निलेश लंके, चैतन्य महाराज देगलुरकर, संत निळोबाराय सेवा संस्थांनचे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत,अध्यक्ष ज्ञानदेव पठारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते. होळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना अशोक चव्हाण यांच्यावरील प्रेम व्यक्त करताना सांगितले की आज सकाळपासून हवामान खराब होतं त्यामुळे हेलिकॉप्टर ने पारनेरला जाऊ का नाही अशी परिस्थिती असताना माझ्या डोळ्यासमोर उठल्यापासून अशोकच होता जर आपण गेलो नाही तर याला झटका बिटका यायचा नाही तर काही करून घ्यायचा असे मिश्कीलपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.मात्र आपलं त्याच्यावर प्रेम असल्यामुळे आपण येथे येणारच होतो असही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अशोक सावंत हा सर्वांना मिळून मिसळून घेणारा आणि सर्वांवर प्रेम करणरं नेतृत्व असल्याचाही उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केल.