Homeक्राईमअंगावर गुन्हे होते तेरा रामराव ढिकलेंनी जाळीत अडकवला त्याला, कुविख्यात गहीनीनाथ उर्फ...

अंगावर गुन्हे होते तेरा रामराव ढिकलेंनी जाळीत अडकवला त्याला, कुविख्यात गहीनीनाथ उर्फ गहिन्या ईश्व-या भोसले ,सोन्या भोसलेच्या श्रीगोंदा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

advertisement

श्रीगोंदा दि २५ फेब्रुवारी

श्रीगोंदा पोलिसांनी अहमदनगर सोलापूर रोडवर असलेल्या मांडवगण फाटया जवळच बनपिंपरी कडे जाणाऱ्या रोडवर दरोडेखोरांची टोळी पकडली असून या टोळीमधील सराईत गुन्हेगार गहीनीनाथ उर्फ गहिन्या ईश्व-या भोसले ,सोन्या उर्फ लाल्या ईश्व-या भोसले या दोघांना पकडण्यात यश आले आहे. तर चार आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले आहेत.

गहिनीनाथ उर्फ ईश्वरा भोसले आणि सोन्या उर्फ लाल्या ईश्वरा भोसले यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे पोलिसांनी या आरोपींना जेव्हा पकडले तेव्हा त्यांच्या जवळ दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले तसेच काही रोख रक्कम ही त्यांच्याकडे आढळून अली असून पोलिसांनी या आरोपींकडून 1 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अहमदनगर,पुणे,सोलापुर,बीड,उस्मनाबाद जिल्ह्यांमध्ये दरोडा ,रॉबरी,घरफोडी अशा प्रकारचे खालील गुन्हे
दाखल आहेत.

या दोन्ही आरोपी दरोडा,दरोड्याची तयारी सारख्या गंभीर गुन्ह्यात ब-याच दिवसापासुन फरार होते त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या
मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोसई सुनिल सुर्यवंशी,पो.उप.निरी.अंकुश ढवळे,पोना गोकुळ इंगवले,पो.कॉ प्रकाश मांडगे, पो.कॉ किरण बोराडे,पो.कॉ अमोल कोतकर, पो.कॉ टाके,म.पो.कॉ.दिपाली भंडलकर,पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोसई अमित माळी व पो.कॉ/वैभव गांगर्डे हे करीत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular