अहमदनगर दि 3
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री माजी मंत्री यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर आता कर्जत जामखेड चे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितल आहे.
‘गेली दोन वर्ष मी त्याला हुलकावणी देत होतो मात्र आज त्याने मला गाठलेच’ अशा शब्दात त्यांनी आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची पोस्ट केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील,महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता आमदार रोहित पवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.