अहमदनगर दि १५ मार्च
हा अहमदनगर शहरातील सावेडी पाईपलाईन रोड येथील यशोदा नगर समोरील सुमारे वीस ते पंचवीस पत्र्यांच्या शेड टाकून अनधिकृत दुकान काढण्याचे काम महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हाती घेतले आहे.
या पत्र्याच्या शेड बाबत अनेक तक्रारी झाल्या होत्या मात्र या दुकानांना हात लावण्याची हिंमत अद्यापही कोणाला नव्हती मात्र आज महानगरपालिकेकडून मुहूर्त मिळाला असून आज सकाळीच मोठा फौजफाटा ही दुकाने काढण्यासाठी पाईपलाईन रोडवर उपस्थित होते.मोठया पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमण झालेल्या टपर्या काढण्यात येत आहेत.