अहमदनगर प्रतिनिधी-
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात अग्निकांड प्रकरणी निलंबित असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे डॉक्टर सुनील पोखरणा यांनी तपासी अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करावे असे आदेश दिले आहेत.तर तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या 304 कलमान्वये गुन्ह्या मध्ये पोलिसांना डॉक्टर सुनील पोखरणा यांना अटक करायची असेल तर त्यांना 25 हजार रुपयांचा व्यक्तिगत जात मुचलक्यावर मुक्त करावे जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्नी तांडव प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात या आधी एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना पोलिसांनी अटक केली आहे .या प्रकरणात डॉक्टर सुनील पोखरणा यांना अटक होईल याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच डॉक्टर सुनील पोखरणा यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता अहमदनगर न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम आर नातू यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली डॉक्टर पोखरणा यांच्या वतीने एडवोकेट प्रकाश कोठारी यांनी बाजू मांडली.