अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगी प्रकरणी पोलिसांनी एका वैदयकीय अधिकाऱ्यासह चार परिचरिकांना पोलिसांनी अटक केली आहे .या अटकेच्या निषेधार्त अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील परिचरिकांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील कामकाज ठप्प झाले असून खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी सुद्धा आज एक दिवसीय बंद पळून परिचारिका संघटनेला पाठींबा दिला होता.या बंद ला आता राज्यभरातून पाठिंबा भेटत असून शुक्रवारी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील परिचारिका एक दिवसीय बंद पाळणार असल्याची माहिती महराष्ट्र परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी दिली आहे. तसेच जिल्हा रुग्णलयात जो पर्यंत आग प्रतिबंधक साहित्य बसवले जाणार नाही आणि या आगी प्रकरणात जे खरे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचं सुरेखा आंधळे यांनी सांगितले आहे