Homeक्राईमअहमदनगर जिल्हयात संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश...

अहमदनगर जिल्हयात संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भाणुदास कुऱ्हाडे टोळी विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाईस मंजुरी

advertisement

अहमदनगर दि १९ जानेवारी

अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड
करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत त्यांचे विरुध्द
मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

त्या अनुशंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९९/२०२१ भा.दं.वि. क. ३९५,३२४,४५२,४२७,
१२० (ब) प्रमाणे गुन्हा दि. २२/१०/२०२१ रोजी पहाटे ३.४५ वा.चे सुमारास झेन इलेक्ट्रीक कंपनी प्लॉट नं L-
२६ एमआयडीसी अहमदनगर. येथे घडला असून सदरचा गुन्हा सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भाणुदास
कुन्हाडे व त्यांचे टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदर टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये
कारवाई करणे करीता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहह्याक पोलीस निरीक्षक युवराज आठरे  यांनी (मोक्का) प्रस्ताव पोलीस उपमहानिरीक्षक बी जी शेखर यांचेकडे पुर्व मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.हा प्रस्तावास दिनांक १९ जानेवारीला महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलमाप्रमाणे वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळाली असुन  या टोळीत
१) सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भाणुदास कुन्हाडे वय ३३ वर्ष मुळ रा, चितळी रेल्वे स्टेशन चितळी ता.राहता
जि.अ.नगर हल्ली रा, वडगावगुप्ता ता.जि.अ.नगर (टोळीप्रमुख)
२) राहुल सुरेश जाधव वय २१ वर्ष राहणार पाण्याचे टाकी जवळ, प्रवरा संगम ता.नेवासा
३) पंकज बापु गायकवाड वय २७ वर्ष रा.गोधवणी ता.श्रीरामपुर जि.अ.नगर
४) आकाश रामचंद्र भोकरे वय २३ वर्ष रा.कायगावटोक ता.गंगापुर जि.औरंगाबाद
५) सांगर गोरख मांजरे रा.श्रीरामपुर जि.अ.नगर
६) सतिष मच्छिद्र शिंदे रा.गणेश चौक बोल्हेगाव ति.जि.अ.नगर
७) अमोल सटवा कापसे रा.कॉटेज कॉर्णन,अ.नगर
८) विक्की उर्फ विकास शिंदे रा.श्रीरामपुर जि.अ.नगर
९) विकास अशोक जाधव रा.पाखोरा ता.गंगापुर जि.औरंगाबाद

या गुन्हेगारांचा समावेश आहे या टोळी विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अठरा गुन्हे दाखल आहेत.

त्या मध्ये प्रामुख्याने एमआयडीसी, कोपरगाव, श्रीरामपूर, तोफखाना, लोणी पोलीस स्टेशन तसेच नाशिक जिल्हयातील गंगापूर, उपनगर पो.स्टे. सातपुर पो.स्टे. नाशिक रोड पो.स्टे. हद्दीत गंभिर स्वरुपाचे संघटीतपणे मालाविरुद्ध व शरिराविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे ज्यामध्ये दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, दरोडयाची तयारी करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, फसवणुक करुन दरोडा टाकणे अशा स्वरुपाचे गुन्हे कट करुन स्वत:चे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करुन केलेले आहेत.

अशा प्रकारे अहमदनगर जिल्हातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे टोळीविरुध्द देखील आगामी काळात मोक्का कायदया अन्वये कारवाई करणार असल्याचे संकेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी दिले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular