- अहमदनगर प्रतिनधी –
अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांनी तडीपारी आदेशाचा भंग करून जिल्ह्यात बेकायदेशीर वास्तव्य करत असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पवन येथु भिंगारदिवे, गणेश शिवाजी लोखंडे आणि सुरत संभाजी शिंदे या तिघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव करून अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र या आदेशाचा भंग करून चोरीछुपे जिल्ह्यात विविध ठिकाणी वास्तव्य करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांना कळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे सहायक फौजदार राजेंद्र वाघ सहह्याक फौजदार संजय खंडागळे पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू फोलाने पोलीस कॉन्स्टेबल भिमराज खसें यांच्या पथकाने या तिघांनाही ताब्यात घेऊन हद्दपारी चा आदेश भंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन भिंगार पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करून संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात या तिन्ही आरोपींना देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.