अहमदनगर दि.११ जानेवारी
अहमदनगर शहरात सध्या अनेक नागरिकांना त्यांच्या मोबाईल नंबर वर मेसेज येत आहेत आणि तो मेसेज वाचून त्यांना धक्काच बसतो कारण कोणतीही टेस्ट न करता आणि त्यांना कोविड टेस्ट मॅसेज एक विशिष्ट तपासणी केंद्रातून येत आहे. हा मेसेज आल्यानंतर त्या मोबाईल धारकाला धक्का बसल्याशिवाय राहत नाही करण कोणतीही टेस्ट न करताच आपण केलेली कोरोना टेस्ट निगेटीव्ह अली असल्याचा हा मेसेज मोबाईल धारकांना मिळत आहे.
या मेसेज मध्ये त्या रुग्णाचे संपूर्ण नाव नमूद असते.मात्र हे मेसेज कोण पाठवत आहे आणि यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत संभ्रमावस्था आहे.
अनेक नागरिकांच्या डाटा या ना त्या मार्गाने बाहेर गेलेला असतो त्यामुळे या मोबाईल डाटाचा गैरउपयोग करून काही गैरप्रकार तर चालू नाही ना अशी शंका आता येऊ लागली आहे. नगर मधील अनेक नागरिकांना असे मेसेज सध्या येऊ लागले आहेत. या मेसेज बाबत चौकशी होणे गरजेचे आहे कारण तपासणी न करता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज एखाद्या नागरिकाला आला तर काहींना धक्का बसू शकतो.