Home जिल्हा अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्रॉनवाढू लागला ‘या’ तालुक्यात आढळला संशयीत रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्रॉनवाढू लागला ‘या’ तालुक्यात आढळला संशयीत रुग्ण

पाथर्डी दि.९ जानेवारी

संपूर्ण राज्यात ओमायक्रॉन या आजाराचे रुग्ण वाढत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील पहिला रुग्ण श्रीरामपूरमधे आढळला त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथे देखील एका महिलेला ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती समजली आहे.

कोरोना महामारी सुरू झाल्यामुळे मुंबई येथे राहत असलेले कुटुंब दोन वर्षापासून त्यांच्या मूळ गावी डमाळवाडी येथे राहत आहे. परंतु कुटुंबातील तीन व्यक्तींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्यामध्ये संबंधित महिलेचा पुणे येथून आलेल्या रिपोर्टमध्ये ती ओमायक्रोन बाधित असल्याचे समजले असून पती व मुलगा हे कोरोणा बाधित असल्याचे माहिती समजली असून ओमायक्रोन संदर्भातही त्यांचा पुणे येथून रिपोर्ट येणार आहे त्यानंतर ओमायक्रोनचे नेमकी रुग्ण किती हे समजणार आहे.

एकंदरीत तालुक्यात कोरोना बाधितांची आकडेवारी हळूहळू वाढत असून ओमायक्रोनचाही रुग्ण तालुक्यात आढळल्याने चर्चेला उधाण आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version