अहमदनगर दि२१डिसेंबर
नगरपंचायतीच्या निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस असून कर्जत आणि पारनेर नगरपंचायती साठी मतदान होत आहे. कर्जत नगरपंचायतीची निवडणूक ही माजी मंत्री आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असून अत्यंत चुरशीची निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. निवडणुकीआधीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला काही धक्के दिले आहेत मात्र आता निवडणुकीच्या निकालातून मतदारांचा कौल काय असणार आहे हे उद्या निकाल आल्यानंतर समोर येईल.
दुपार पर्यंत कर्जत नगरपंचायती साठी 40% इतके मतदान झाले आहे. तर पारनेर नगरपंचायत मध्ये सुद्धा तिरंगी लढत होत असून याठिकाणी महाविकास आघाडी मधील एकत्र असलेले पक्ष नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये समोरासमोर उभे ठाकले आहेत.विधानसभेचे माजी सभापती विजय औटी तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. आतापर्यंत पारनेर मध्ये सर्वाधिक म्हणजे 61 टक्के मतदान झाल्याची नोंद झलीआहे. कर्जत पेक्षा पारनेर मतदार संघात मतदानाची टक्केवारी जास्त आहे तर अहमदनगर शहरातील वार्ड क्रमांक नऊ साठी पोटनिवडणूक होत असून या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होत असून ठिकाणी अत्यंत संथ गतीने मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकारानुसार या ठिकाणी 16.57% मतदान झाले आहे.पोटनिवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने अनेक वेळा निकालही वेगळा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मतदारांना बाहेर काढणे हेच डोकेदुखी सध्या उमेदवारांसमोर आहे.