अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाली असून २०२१ते २०२६ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत बाबासाहेब मुदगल आणि जितेंद्र सर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल आघाडी घेत आपले पॅनल तयार करून प्रचाराला सुरुवात केली आहे. सहकार पॅनल मध्ये सर्वसाधरण गटातून बाबासाहेब मुदगल,जितेंद्र सारसर, बाळासाहेब पवार, अजय कांबळे,कैलास चावरे, सतीश ताठे, श्रीधर देशपांडे, विकास गीते, विजय कोतकर, बलराज गायकवाड, महिला राखीव गटा मधून प्रमिलाताई पवार ,उषाताई वैराळ, इतर मागास प्रवर्ग गटा मधून किशोर कानडे अनुसूचित जाती जमाती गटा मधून गुलाब गाडे तर इतर भटक्या विमुक्त जाती गटा मध्ये बाळासाहेब गंगेकर हे उमेदवारी करत आहे सभासदांना एकूण पंधरा मते द्यायचे असून निवडणूक खऱ्या अर्थाने सोमवारपासून सुरू होणार आहे अर्ज वाटपाचा कार्यक्रम सोमवार पासून सुरू होणार असून पुढील महिन्याच्या अठरा तारखेला निवडणुकीची खरं चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत आता या निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी चांगलीच रंगत येणार आहे सध्यातरी सहकार त्यांनी आघाडी घेत आपला पॅनल तयार करून प्रचाराला सुरुवात केली आहे.