अहमदनगर प्रतिनिधी
जिल्ह्यात सध्या अनेक निवडणुकांचे बिगुल वाजले असून त्याची सुरुवात सहकारी संस्थांच्या निवडणुकाने सुरू झाली आहे तर आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद ,विधानपरिषद या निवडणुका येऊ घातल्या आहेत.सध्या अहमदनगर मध्ये अहमदनगर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचारी संस्था या दोन्ही निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून. आज शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या आणि अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकी निमित्त उमेदवारांनी उपनिबंधक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण गटा मधून अपक्ष उमेदवार म्हणून शेख राजू महबूब यांचा अर्ज भरण्यात आला यावेळी राजु सरायकर, प्रफुल्ल लोंढे, सचिन पटेकर, अनिल शिंदे, मोहन ढवळे, पाशा कुरेशी, अवधूत देशपांडे, आयुब शेख, अँड. समीर पटेल, अँड.सारस क्षेत्रे, हाजी अकिल, हाजी.एजाज आदी उपस्थित होते. राजू शेख हे निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत वेळोवेळी सभासदांचे सोडलेल्या प्रश्नांमुळे आपला विजय निश्चित असल्याचे राजू शेख यांनी यावेळी सांगितले आहे त्याच विश्वासावर त्यांनी या वेळी अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून आपला विजय निश्चित असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले