अहमदनगर प्रतिनिधी-
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९(क)साठी पोटनिवडणूक होत असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली होती.त्यानंतर आज अर्ज छाननी च्या दिवशी महानगरपालिकेच्या कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवार कैलाश शिंदे यांनी हरकत घेतली होती मात्र या हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अनेक पक्षांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.काँग्रेस या निवडणुकीपासून काहीसे अलिप्त राहिल्याचे चित्र दिसून आले आहे.आज अर्ज छाननी मध्ये पुढील प्रमाणे मतदारांच्या अर्ज वैध ठरले आहेत.साळवे अनुराधा अजय,अजय साळवे ,तिवारी सुरेश रतनप्रसाद तिवारी,परदेशी प्रदीपअमरसिंग,चिप्पा अभिजीत विठ्ठल,गुंडला ऋषीकेशबालय्या,चव्हाण अमित दिपक,शिंदे कैलास बापुराव ,शेकटकर वंदना गणपत,पाथरे पोपट भानुदास ,ढोणे गौरव अरुण, वाघमारे संदिप दिलीप या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून आता सर्वांचे लक्ष अर्ज माघारी घेण्याच्या दिवसाकडे लागले आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.