अहमदनगर दि.२५ मार्च
अहमदनगर शहरातील मुख्यबाजार पेठेतील रोड (एम.जि. रोड) वर मोठा बाजार असून या ठिकाणी रस्त्यावर उभा राहून हातगाडी वर व्यापार करणाऱ्या पथविक्रेत्यांवर स्थित महात्मा गांधी रोड (एम.जि. रोड) येथे मोठा बाजार काही स्थानिक नागरिक विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये खोटी तक्रार व दाखल करीत असल्यामुळे सतत त्यांना हटविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसानंतर मुस्लीम समजाचा पवित्र रमजान महिना सुरु होणारआहे अशावेळेस फेरीवाल्यांना त्रास न देता त्यांना तेथेच व्यवसाय करू देण्यात यावा तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी व फेरीवाल्यांना बाजाराजवळ हॉकर्स झोन बनवण्यास संबंधित विभागास निर्देश देण्यात यावे आशा आशयाचे पत्र समाजवादी पार्टीचे आमदारअबू आसिम आजमी यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.