अहमदनगर दि.१० डिसेंबर
अहमदनगर शहरातील आनंद धाम शेजारील शिंदे हॉस्पिटलच्या परिसरामध्ये एक बेवारस बॅग असल्याची माहीती मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. ,या बाबत कोतवाली पोलिस पोलिसांना माहीती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तातडीने आपल्या फौजफाट्यासह आनंदधाम येथे धाव घेतली आणि त्या बेवारस बॅग ठेवलेल्या ठिकाणची पाहणी करून आसपास कुठे सीसी टीव्ही फूटेज भेटते का या बाबत चौकशी सुरू करून तातडीने बॉम्बशोध पथकाला माहीती दिली. या पथकाने आनंद धाम परिसरात आसपासच्या तपासणी केली. या दरम्यान सीसीटीव्ही मध्ये या ठिकाणी एक महिला आणि पुरुष आल्याच चित्रीकरण झाले होते आणि त्या महिलांनी पुरुषाने इथे बॅग ठेवल्याचे दिसून येत आहे. मात्र पोलिसांच्या अंदाजानुसार महिला व पुरुष ही बॅग विसरून गेले असं सीसी टीव्ही फुटेज वरून दिसून येत आहे. ही बॅग सध्या बॉम्बशोध पथकाच्या ताब्यात असून. कोतवाली पोलीस सीसीटीव्ही आधारे महिला आणि पुरुष याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी अशा काही घटना घडल्यास किंवा बेवारस बॅग दिसल्यास त्वरित पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवहान पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.