अहमदनगर दि १ मार्च
अहमदनगर शहरात 100 छोटे मोठे रस्ते तयार झाल्याचं महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात झालेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
शहरातील रस्त्यांची परिस्थिती पाहता शहरात एकही रस्ता सध्या चालणे योग्य नाही याबाबत सोशल मीडियावर अनेकदा टीकाही होत आहे.
मात्र महानगरपालिकेने आज पर्यंत शंभर छोटे मोठे रस्ते तयार केले असल्याची माहिती खुद्द महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर दिल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे याबाबत महानगरपालिकेकडे यादी असल्यासही त्यांनी सांगितले मात्र नगर शहरात हे रस्ते कुठे आहेत हे शोधावे लागेल