अहमदनगर प्रतिनिधी-
अहमदनगर शहर कचराकुंडीमुक्त व्हावे, यासाठी शहरातील १००% कचरा संकलन करण्यासाठी खाजगी एजन्सीच्या मार्फत नियोजन केले. त्यामुळे संपूर्ण शहरातील कचरा उचलला जाऊ लागला व अहमदनगर शहर कचराकुंडी मुक्त झाले.आपले शहर कचराकुंडी मुक्त झाले असून, हे ध्येय मनपा कर्मचारी तसेच नागरिकांच्या सामुहिक जबाबदारीतून पूर्ण झाले आहे.त्यामुळे नगर शहराला स्वच्छ भारत अभियानामध्ये ३-स्टार मानांकन मिळाले. यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील अबाधीत राहण्यासाठी मदत झाली आहे. पुढील वर्षी भारत स्वच्छ अभियानामध्ये ५-स्टार मानांकन मिळविण्यासाठी आपण सगळे मिळून नक्कीच उपाय योजना करू, संग्राम जगताप यांनी काढलेल्या पत्रकात सांगितले आहे