Homeराजकारणआदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याने कर्जत नगरपंचायतीची निवडणूक रद्द करावी भाजपची निवडणूक आयोगाकडे...

आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याने कर्जत नगरपंचायतीची निवडणूक रद्द करावी भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

advertisement

कर्जत दि .२० डिसेंबर
कर्जत नगर पंचायतीची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असून या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे मात्र आता भारतीय जनता पार्टीने ही मतदान प्रक्रिया थांबून निवडणूक रद्द करावी अशी मागणी केली आहे याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून निवडणूक रद्द करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 14 च्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवरांना कर्जत- जामखेड चे आ.रोहित पवार यांनी दबाव ,दडपशाही व दादागिरी करून व आमिष दाखवून गैरप्रकाराने उमेदवारांवर दबाव टाकून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करून घेऊन आदर्श आचारसंहिता चा भंग केल्याने व इतर ही वॉर्ड मध्ये गैरप्रकाराने उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने राज्य निवडणूक आयुक्त यांना कर्जत नगरपंचायतची निवडणूक रद्द करण्यात यावी अशी आज भारतीय जनता पार्टी, महारष्ट्र प्रदेश च्या वतीने कार्यालयीन सचिव श्री.मुकुंद कुलकर्णी यांच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे.

ही निवडणूक माजी मंत्री राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेची लढाई असून या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ सरळ लढाई होत आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या निवडणुकीत पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक 14 येथील उमेदवार बिनविरोध निवडून आणून भाजपला दणका दिला होता त्यानंतर भाजपच्या काही अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया संपत आली असताना आणि उद्या मतदान होणार असल्याने भाजपने अर्ज शेवटच्या दिवशीच का दिला याबाबतही कर्जतमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular