अहमदनगर
अहमदनगर महानगरपालिकेतील नोंदणीकृत ठेकेदार संघटनेने बेमुदत काम बंद इशारा दिला असून अहमदनगर शहरामधील सध्या जी विकास कामे सुरू आहेत ते ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. ठेकेदार संघटनेने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन काम बंद करण्याचा इशारा दिला आहे जोपर्यंत ठेकेदार संघटनेच्या विविध मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचं या संघटनेचे अध्यक्ष आनंद पुंड यांनी सांगितलंय. अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील विविध विकास कामांचे २०११ पासून थकीत देयके अदा करावेत, दिवाळी अगोदर दिलेल्या आश्वासना प्रमाणे प्रत्येक ठेकेदारास २ लाख रुपयांचे देयक द्यावेत, तसेच सन हजार २०११-१२ व २०१३-१४ चे काही देयके लेखा विभागातून गहाळ झालेले असल्यामुळे त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन ही देयके तातडीने अदा करावेत, ऑनलाइन टेंडर भरणे वेळेस भरलेल्या एक टक्के रक्कम कार्यारंभ आदेश झाल्यानंतर संबंधित ठेकेदारास तातडीने अदा करावी, सिक्युरिटी डिपॉजिट बाबत शहर अभियंता यांना अधिकार देण्यात यावेत ,तसेच मूलभूत सुविधा रकमेत मनपाचा ३० टक्के हिस्सा तातडीने जमा करावा अशा विविध मागण्या अहमदनगर महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेने महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केल्या आहेत.त्यामुळे या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा इशारा संघटनेने दिल्यामुळे नगर शहरातील विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. महानगर पालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील विविध ठिकाणे रस्त्यांची तसेच नाल्यांची कामे सुरू आहेत मात्र ही जर कामे अर्धवट राहिली तर पुन्हा नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. मागील पावसाळ्यामुळे नगर शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले होते त्यामुळे तातडीने हे रस्ते दुरुस्त करण्याचं मोठं आव्हान महानगरपालिकेसमोर असताना ठेकेदार संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे महानगरपालिकेसमोर आणखी एक मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर अहमदनगर महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आनंद पुंड उपाध्यक्ष शोएब शेख फकीर मोहम्मद ,राजेंद्र लोणकर ,शेख जाकीर शब्बीर ,अंबादास चौधरी, शेख शहनावाज रफिक, यांच्यासह गणेश साळुंके ,नजीर निसार शेख ,शेख जहीर चंद्रशेखर म्हस्के, सचिन सपाते ,निकेतन लोंढे ,सुनील राऊत ,वसीम पठान ,अमृत नागुल ,अविनाश लोंढे, रिजवान सय्यद,ज्ञानेश्वर जंगम, ओमकार देशमुख, दिगंबर गटने ,राजू औटी,विनय सामलेटी,संतोष बुरा या संघटनेच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून सर्वानुमते काम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन अमोर देयके आल्या करणे आणि काम सुरू करणे हाच पर्याय उरला आहे.