दिल्ली – १ मार्च
उत्तर भारतातील महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुकीचे निकाल हाती येत असून उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यामध्ये भाजप पुन्हा सत्ता स्थापन करू शकते तर पंजाब मध्ये आप सर्वात पुढे असून सर्वात मोठ्या उत्तरप्रदेश मध्ये भाजपा विजया कडे कूच करत आहे.
हाती आलेल्या बातमी नुसार गोव्यात ४० जागा पैकी भाजप 23 काँग्रेस 12 आप 1 mgp 2 इतर 2 असे पक्षीय बलाबल असून पुन्हा गोव्यात भाजपचा झेंडा फडकला आहे
मणिपूर भजाप 30 काँग्रेस 13 npf 1 npp 6 इतर 4
उत्तराखंड भजाप 41 काँग्रेस 20 आप 0 इतर 0
पंजाब काँग्रेस 23 आप 83 sad 8 भाजप 3 इतर 0
उत्तरप्रदेश 283 समाजवादी पार्टी 104बसपा 4 काँग्रेस 4 इतर 5
असे निकाल हाती आले असून भारतीय जनता पार्टी पंजाब वळतात सर्वच ठिकाणी आघाडीवर आहे उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काट्याची टक्कर होईल असा अंदाज असतानाच भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा मुसंडी मारत 240च्या पुढे आकडा नेला आहे.
तर समाजवादी पार्टी शंभरच्या पुढे असून बसपा आणि काँग्रेस जेमतेम तीन ते चार जागांवर पुढे आहेत त्यामुळे काँग्रेसचा पुन्हा एकदा या निवडणुकांमध्ये सफाया झाल्याचं समोर आला आहे.
तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्याअरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पंजाब मध्ये काँग्रेसने किरकोळ समजले होते त्या आपने पंजाब मध्ये 93 जागा जिंकत सत्तेच्या दिशेने कूच केली आहे हा सर्वात मोठा इतिहास म्हणता येईल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आप सारख्या छोट्या पक्षाने दिग्गज काँग्रेस नेत्यांना धूळ चारत सत्तास्थापनेच्या दिशेने कूच केली आहे ही इतिहासातली सर्वात मोठी घटना आज आपने पंजाब मध्ये घडवली आहे