पारनेर दि ४ मार्च
पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या कामामुळे त्यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. मागील दोन वर्षात देशामध्ये कोरोनाची साथ सुरू असताना पारनेर तालुक्या सारख्या ग्रामीण भागात भव्य असे कोविड सेंटर उभारून तिथे आलेल्या रुग्णांची सेवा करून आधार देत कोविड सेंटर कशाप्रकारे चालवले जावे याचं उदाहरण त्यांनी महाराष्ट्रा समोर ठेवलं.
या कोविड सेंटरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभर प्रसिद्ध झाले आहे नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या आणि जनतेसाठी समर्पित करणाऱ्या कामामुळे निलेश लंके चर्चेत असतात.
निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दहा मार्च रोजी हा विवाह सोहळा होणार आहे या सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन निलेश लंके महिला कल्याणकारी संस्था, नवसंजीवनी संयुक्त महिला संस्था निलेश लंके प्रतिष्ठाण,महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब सर्व धर्मिय विवाह सोहळा असे नाव देण्यात आले आहे या विवाह सोहळ्यात मोफत ५१ विवाह लावण्यात येणार आहेत.
ज्या नागरिकांना या मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी
०२४८८-२९५३३३/७२४९५५७६४३/९६३७९४३३३३
या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवहान निलेश लंके महिला कल्याणकारी संस्था,नवसंजीवनी संयुक्त महिला संस्था निलेश लंके प्रतिष्ठाण,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.