Homeराजकारणआमदार रोहित पवार यांचा जोर का झटका कट्टर विखे समर्थक जिल्हा सहकारी...

आमदार रोहित पवार यांचा जोर का झटका कट्टर विखे समर्थक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात आणि भाजपचे पदाधिकारी सुधीर राळेभात यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

advertisement

अहमदनगर दि.६ मार्च नासिर पठाण / अशोक वीर
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात आणि भाजपचे पदाधिकारी सुधीर राळेभात
यांच्यासह जामखेड तालुक्यातील अनेक सोसायट्यांचे चेअरमन, सरपंच, सदस्य, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी मंत्री राधाकृष्ण विखे आणि खा. सुजय विखे यांचे कट्टर समर्थक म्हणून अमोल राळेभात यांची ओळख होती मात्र त्यांनी कमळ सोडून घड्याळा बरोबर घरोबा केल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीत याचा फटका बसेल असा अंदाज राजकीय समीक्षकांनी केला आहे.

कर्जत जामखेड चे आमदार झाल्या पासून आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना मोठे धक्के दिले आहेत. भाजपचे अनेक बडे मासे राष्ट्रवादीमध्ये घेऊन भाजपला कमजोर करण्याचे काम आमदार रोहित पवार यांनी केल आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी एक हाती सत्ता मिळवत आता पुढचे लक्ष जामखेड नगरपालिका असले तर सांगितलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी आता येथे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. जामखेड मधील आणखी काही भाजपाचे बडे मासे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागणार आहेत अशी चर्चा जामखेडच्या राजकीय राजकारणामधे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular