अहमदनगर दि.२० डिसेंबर
जुने व्हिडीओ व्हायरल करण्याची जणू जिल्ह्यात स्पर्धाच लागली आहे असेच सध्याचा चित्र आहे नगर तालुक्यातील शिवसेनेच्या एका नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता महिलेवर अत्याचार प्रकरणी या नेत्यावर अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर हा हनी ट्रॅप करून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्या नेत्याच्या कुटुंबीयांनी केला आहे त्या बाबत पोलिसांना काही इसमांचे नावे देण्यात आली आहेत. दुसरा व्हिडीओ बायोडिझेल प्रकरणातील तर तिसरा एका कर्मचऱ्याचा नाजूक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. शिवसेनेच्या त्याने त्याच्यावरून सध्या चांगलेच राजकारण पेटला असून आता मालकास आघाडीतील मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यामध्ये उडी घेतली आहे तिसगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे
हा व्हिडिओ खोटा असल्याचं त्या नेत्याच्या कुटुंबियांच म्हणणे असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याच्या हेतूने हा सर्व प्रकार सुरु असल्याचे त्यांना सांगितले आहे माझ्यावर आरोप करताना आरोप करणाऱ्यांना माझं नाव कसं घेतलं जर मालकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तुमचेही व्हिडिओ बाहेर येतील तेव्हा तुम्हाला पळाला जागा राहणार नाही असं त्यांनी भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता त्यांना टोला लावला आहे. काही लोकांना जनतेने नाकारले तरी त्यांच्या डोक्यातील विकृत विचार जात नसल्याने ती नेहमीच दुसऱ्यांचा वाईट विचार करत असल्याचाही यावेळी तनपुरे यांनी सांगितलं विकास कामासाठी आपण कटिबद्ध असून तिसगाव पाणी प्रश्नही आपण सोडवला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.