Homeशहरआयपीएलच्या हंगामाला झाली सुरुवात सट्टेबाजी करणारे होणार कंगाल बुकी आणि सावकार मालामाल!

आयपीएलच्या हंगामाला झाली सुरुवात सट्टेबाजी करणारे होणार कंगाल बुकी आणि सावकार मालामाल!

advertisement

अहमदनगर दि.२७ मार्च
आयपीएल क्रिकेट सामन्यांना शनिवार पासून सुरुवात झाली आहे आता पुढील दोन महिने आयपीएल सामने रंगणार आहेत आणि आयपीएल सामन्यांवर सट्टाबाजीला सुद्धा सुरुवात झाली आहे.

दरवर्षी सट्टेबाजी जोरात सुरू असते पोलीस काही सट्टेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करतात मात्र आज पर्यंत पोलीस तपास सट्टेबाजी करणाऱ्या मूळ मालकपर्यंत कधीच पोहचला नाही हे कटू सत्य आहे.

शहरातील आज पर्यंतच्या सट्टे बाजी करणाऱ्या लोकांवर जी कारवाई झाली आहे ती फक्त पंटर लोक पकडण्या पर्यंत झाली आहे मात्र या प्रकरच्या मुळा पर्यंत पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे. या सट्टेबाजीची लिंक मुंबई नागपूर दिल्ली पर्यंत आहे अनेक तरुण या सट्टेबाजी मुळे दरवर्षी कर्जबाजरी होतात आणि काही तरुण कर्जबाजारी मुळे आत्महत्या करतात याची उदाहरणे नगर शहारत आहेत .

नगर शहारत अनेक मोठं मोठे लोक या सट्टेबाजी मध्ये गुंतलेले आहेत सट्टेबाजी सह सट्टा लावणाऱ्या खेळाडूंना पैसे व्याजाने देण्याचा धंदा या काळात जोरात सुरू असतो

घरदार, गाड्या, महागडे मोबाईल,सोनं, आशा वस्तूंवर व्याजाने पैसे दिले जातात तासाला,दिवसाला, महिन्याला विवीध प्रकारचे व्याज आकारले जाते मात्र आज पर्यँचा इतिहास पाहता आयपीरल सट्टा बाजी मध्ये फक्त खेळवणारा नफ्यात असतो खेळणारा नेहमी तोट्यात जातो तरीही कमी श्रमात जास्त पैसे मिळण्याच्या हव्यासापोटी सट्टेबाजी जोरात सुरू असते आता या सट्टेबाजी मध्ये सर्वच स्थारतील पुरुष, तरुण,अल्पवयीन मुले खेळात सहभागी असतात हे विशेष करोडो रुपयांचा व्यवहार या आयपीएलच्या सट्टेबाज यातून होत असतो.

शनिवारपासून आयपीएल सामने सुरू झाले असले तरी त्या आधीच काही दिवसापासून सट्टेबाजी करणाऱ्या बुकींनी जय्यत तयारी सुरू केली होती हॉटेल लॉज बुकिंग किंवा रिकाम्या फ्लॅट मध्ये कॉल सेंटरच्या माध्यमातून बुकिंग घेतली जाते सुरूवात संथ असली तरी हळूहळू यात वेग घेतला जातो आणि शेवटच्या दिवसांपर्यंत अब्जावधी रुपयांचा सट्टा या क्रिकेट सामन्यांवर लावला जातो

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular