Home विशेष आश्चर्यकारक वर्ग चारच्या भरतीसाठी डॉक्टरांसह अभियंते आणि उच्चशिक्षित तरुण भरतीच्या लाईन मध्ये

आश्चर्यकारक वर्ग चारच्या भरतीसाठी डॉक्टरांसह अभियंते आणि उच्चशिक्षित तरुण भरतीच्या लाईन मध्ये

अहमदाबाद, वृत्तसंस्था
बेरोजगारी मुळे आता नोकरीची कोणतीही संधी अली तर सोडायची नाही असेच आजच्या तरुणांनी ठरवल्याचे दिसतंय मग ती सरकारी नोकरी असली तर मग पद कोणतेही असो नोकरी मिळण्याशी मतलब म्हणून उच्च शिक्षित तरुण थेट शिपाई पदाची परीक्षा देत आहेत.

गुजरात मध्ये उच्च न्यायालय आणि त्याअंतर्गत येणान्या इतर न्यायालयांत वर्ग चारच्या ११४९ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी उडी घेत दीड लाखाच्या वर उमेदवारांनी अर्ज भरले.

त्या पैकी ४ हजार ९५८ अर्ज पदविधारकांचे होते.जेव्हा निवड प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्यांपैकी ७ डॉक्टर ४०० अभियंते, आणि पाचशे वर पदवीधर होते.

वर्ग चारची नोकरी स्वीकारण्याचे करण सांगताना या उमेदवारांपैकी अनेकांनी सध्याची बेरोजगारी तसेच सरकारी नोकरी असल्याने वेळेवर मिळणारा पगार तसेच खाजगी क्षेत्रात झालेली अनियमता आणि स्पर्धा त्यामुळे खाजगी नोकरी टिकवण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागतो सरकारी नोकरी मिळाली तर वेळेत मिळणारा पगार आणि काही तास काम करून इतर व्यवसायात लक्ष देण्याची मिळालेली संधी यामुळे वर्ग चारची असली तरी सरकारी नोकरी मिळाली म्हणून खूश आहोत असे सांगितलं.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version