Homeजिल्हाईडीच्या कारवाई नंतर महाराष्ट्राचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टाकलेली ती पोस्ट...

ईडीच्या कारवाई नंतर महाराष्ट्राचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टाकलेली ती पोस्ट होतीय चांगलीच व्हायरल.

advertisement

राहुरी दि २८ फेब्रुवारी

राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) फेऱ्यात अडकले असून ईडी ने आज प्राजक्त तनपुरे यांच्या काही जमिनींवर टाच आणली आहे.

राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याची 90 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. आधी ही तक्षशिला सिक्युरिटीजच्या नावावर ही जमीन होती. नंतर ती तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड अॅग्रो कंपनीने खरेदी केली होती. याचबरोबर तनपुरे यांच्या मालकीच्या 4.6 एकरच्या दोन बिगरशेती जमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 26 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीच्या आधारे ईडीने करचुकवेगिरीची चौकशी सुरू केली होती. चौकशीनंतर ईडीने तनपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

आज दुपारनंतर किड्स या कारवाईनंतर प्राजक्त तनपुरे यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही मात्र सोशल मीडियावरील त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट टाकली असून ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतीय पाहूया नेमकं काय लिहलं आहे या पोस्ट मध्ये

आमदार व राज्यमंत्री झाल्यापासून माझ्या आयुष्यातील
प्रत्येक क्षण माझ्या राहुरी मतदारसंघातील, नगर जिल्ह्यातील व राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या, वेदनेच्या सोडवणुकीसाठी अत्यंत प्रामाणिक भावनेने जगलो आहे.सर्वसामान्यांचे, गोरगरीब जनतेचे अश्रू पुसताना कधीही जात पात, धर्म, राजकीय भुमिका या गोष्टी बघितल्या नाही.दिवसरात्र एक करून काम करत राहिलो. कितीही अडचणी आल्या तरी सर्वसामान्य जनतेप्रति सेवेच्या या व्रतात खंड पडणार नाही.
ही शिकवण आदरणीय पवार साहेबांनी दिली आहे. साहेब,आपण ज्या विश्वासाने मला जबाबदारी दिली आहे, त्यास कधीही तडा जाऊ देणार नाही.”

ही पोस्ट ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वर पोस्ट झाली असून आता चांगलीच व्हायरल होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular