अहमदनगर दि.३० मार्च
आयपीएल सिजन सुरू झाला आणि सट्टेबाजीला ऊत आला असून अनेक हॉटेल सध्या हाऊसफुल होऊ लागली आहेत. मात्र शहरातील बुकी मात्र शहर सोडण्याच्या तयारीला लागले आहे कारण सध्या यादी मधील फोन कॉलने सट्टेबाजी करणारे परेशान झाले आहे.
कारणही तसेच आहे त्याने पथकात नव्यानेच केली एन्ट्री आणि धीरूभाईच्या गोलंदाजीवर मारली तीन लाखाची जंत्री असा वी साध्य जोरात आहे.मात्र सुरुवातीच्या षटकात एवढा मोठा शॉट मारल्याने बुकींनी चांगलाच धसका घेतला आहे.
मात्र यादी मधील सर्वानाच फोन जाऊ लागल्याने आणि अव्वाच्या सव्वा मागणी होऊ लागल्याने आता बुकी शहर सोडून जवळपासच्या तालुक्यातील ठिकाणी जात आहेत कारण सर्व काही ऑनलाईन असल्याने कुठेही बसून बुकींना सट्टा घेता येतो नगरची कटकट नको म्हणून शिरूरला जाऊन अनेकांनी हॉटेल बुक केले आहेत .
सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागल्याने मायेच्या पार्वताने सर्वांनाच सावली दिली आहे तर अनेक जण आपल्याला पर्वताची सावली मिळावी म्हणून पर्वताच्या सावली खाली धावत आहेत.
मात्र हे कोणाच्याच लक्षात येत नाही की या सट्टेबाजी मुळे तरुण पिढी बरबाद होत चालली आहे कमी श्रमात पैसे मिळवण्याच्या नादात अनेक तरुण या सट्टेबाजीकडे आकर्षिले जात असतात आणि त्यामधूनच कर्ज बाजारी आणि आत्महत्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर घडतात त्यामुळे या सट्टेबाजी वर पोलिसांनी कडक कारवाई करून त्याला आळा घालावा अन्यथा पुढची पिढी दरवर्षी अशीच बरबाद होत राहील.