Homeजिल्हाएकाच आठवड्यात नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे अवैद्य धंदयावर...

एकाच आठवड्यात नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे अवैद्य धंदयावर छापे

advertisement

अहमदनगर दि २२ मार्च

नगर तालुका, भिंगार व पारनेर तालुक्यातील अवैध धंदयावर छापे टाकुन दोन महिला आणि चार पुरुषांनविरुद्ध आशा सहाआरोपी विरुध्द कारवाई करुन १,३७,०००/- रुपये किंमतीचे अवैध गावठी हातभट्टीचे साधने व तयार दारुचा साठा नाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/भाऊसाहेब काळे,
पोहेकॉ.विजयकुमार वेठेकर, पोहेकॉ.बबन मखरे, पोहेकॉ.संदीप घोडके, पोहेकॉ.देवेंद्र शेलार, पोना.शंकर
चौधरी, पोना.सचिन आडबल पोहेकॉ.संभाजी कोतकर यांचे स्वतंत्र पथक जिल्ह्यातील अवैध व्यवस्थांवर कारवाई करणेबाबत सूचना दिल्यात आल्या होत्या त्यानुसार नगर तालुका भिंगार आणि पारनेर या ठिकाणी छापे टाकून अवैध गावठी हातभट्टीची अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत

विशेष म्हणजे या आठवड्यात नगर तालुका हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेळा कारवाई केली असली तरी नगर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस स्वतःहून अवैध धंद्यांवर कारवाई का करत नाही असा प्रश्न समोर येतोय.

१) नगर तालुका पो.स्टे. गुरनं. १६७/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- ४,५००/-रु. किं.ची त्यामध्ये ४५ लि. तयार दारु
आरोपी :- विक्रम लक्ष्मण पवार वय ३६, रा. नेप्ती राजवाडा, ता. नगर
२) नगर तालुका पो.स्टे. गुरनं. १६८/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- ५१,०००/-रु. किं.ची त्यामध्ये ६० लि. तयार दारु व ९०० लि. गावठी हातभट्टी दारु
तयार करण्यासाठी लागणारे
आरोपी :- गणेश टिल्लू पवार वय ४५, रा. पवारवस्ती, नेप्ती, ता. नगर
३) भिंगार पो.स्टे. गुरनं. १११/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- १२,५००/-रु. किं.ची त्यामध्ये २५ लि. तयार दारु व २०० लि. गावठी हातभट्टी
दारु तयार करण्यासाठी लागणारे
आरोपी :- एक महिला आरोपी (फरार)
४) भिंगार पो.स्टे. गुरनं. ११२/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- १३,०००/-रु. किं.ची त्यामध्ये ३० लि. तयार दारु व २०० लि. गावठी हातभट्टी
दारु तयार करण्यासाठी लागणारे
आरोपी :- एक महिला आरोपी (फरार)
५) पारनेर पो.स्टे. गुरनं. २०७/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- १३,५००/-रु. किं.ची त्यामध्ये ३५ लि. तयार दारु व २०० लि. गावठी हातभट्टी दारु
तयार करण्यासाठी लागणारे
आरोपी :- विजय सुदाम गव्हाणे रा. खारवाडी, ता. पारनेर (फरार)
६) पारनेर पो.स्टे. गुरनं. २०८/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- ४२,५००/-रु. किं.ची त्यामध्ये २५ लि. तयार दारु व ८०० लि. गावठी हातभट्टी दारु
तयार करण्यासाठी लागणारे
आरोपी :- बाजीराव शंकर गायकवाड, रा. पळशी, ता. पारनेर (फरार)

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular