अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आग प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून यामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे तर चार कर्मचारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्या निलंबनानंतर आता ही मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे ज्या कर्मचाऱ्यांना अटक केले आहे त्यांच्याकडे चौकशी करण्याचे काम सध्या सुरू असून यामधून अजून आणखी काही माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे