Homeक्राईमकत्तलीकरीता आणलेल्या ३ जिवंत गायी, २० जिवंत जर्सी लहान वासरे या गोवंशीय...

कत्तलीकरीता आणलेल्या ३ जिवंत गायी, २० जिवंत जर्सी लहान वासरे या गोवंशीय जनावरांची सुटका करुन आरोपी यांना कोतवाली पोलीसांकडुन अटक

advertisement

अहमदनगर दि.२ जानेवारी
कोतवाली पोलिसांनी अहमदनगर शहरातील हमाल वाडा,झेंडीगेट, जुने नगर तालुका पोलीस स्टेशन परिसरात छापे टाकून कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावारांची सुटका करण्यात आली असून गोवंशीय जनावरांच्या मांस जप्त करण्यात आले आहे सुमारे तीन लाख 77 हजरांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी तोफिक युनुस कुरेशी,वय ३४ वर्ष, रा. ब्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अ.नगर , कादर मुसा
शेख, वय ४० वर्ष, रा. कोठला, मंगल गेट चौकी जवळ, अनगर , जमिल अब्दुल सय्यद, वय २४ वर्ष, रा. कोठला या आरोपीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणातील प्रमुख आरोप अब्दुल बारी याच्या सांगण्यावरून कत्तलीसाठी काम करत असल्याचे ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सांगितले आहे

या छाप्यात ३ जिवंत गायी व २० जिवंत वासरे ताब्यात घेण्यात आली असून ही जनावरे सुपे येथील शहांजापुर गोपालन संस्थेला देण्यात आली आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल दिपक रोहकले यांच्या फिर्यादी वरून भादवि कलम २६९, महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनीयम कलम ५ (क), व सुधारीत सन २०१५ चे कलम ९ सह प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनीयम कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे, पोसई गजेंद्र इंगळे, चा.पोहेकॉ बाबासाहेब तागड व गुन्हे शोध पथकाचे पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोना योगेश कवाष्टे,पोना ए.पी.इनामदार,पोकाँ अभय कदम, पोकाँ दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सोमनाथ राउत ,पोकॉ प्रशांत बोरुडे यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular