डोंबिवली दि.१ फेब्रुवारी
निवडणूक जवळ आली की टीका टिपण्णी आणि बॅनर युद्ध सुरू होते.सध्या महराष्ट्रात औरंगाबादमध्ये बायको पाहिजे या बॅनरची राज्यात चर्चा असतानाच सोमवारी लावलेले डोंबिवलीतील पोस्टकार्ड बॅनर चर्चेत आले आहे.
विकास कामांवरुन मनसेने डोंबिवलीत एक लक्षवेधी बॅनर लावला आहे. पोस्टकार्ड फॉरमॅट असलेल्या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेवर टिका करण्यात आली आहे. ”कधी तरी तयार झालेला रस्ता सुद्धा दाखवा” असे या बॅनरवर लिहण्यात आले आहे. आपले कृपाभिलाषी त्रसलेले डोंबिवलीकर. होर्डिग आणि बॅनरबाज मंडळी डोंबिवली परिसर पिनकोडचा उल्लेख केलेला आहे.
एमआयडीसी विभागात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून रस्ते विकासासाठी ११० कोटी रुपये मंजूर झाल्याचे बॅनर लावण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर ही बॅनर बाजी करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील मिलाप नगर परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे.






