नवी दिल्ली – विशेषवृत्त
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल (Saurabh Kirpal) यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे (Delhi high court) न्यायाधीश बनवण्याची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे ते भारतातील पहिले समलैंगिक न्यायाधीश होऊ शकतात. नियुक्ती झाल्यास ते भारतातील पहिले समलैंगिक न्यायाधीश असतील.या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) एक निवेदन जारी करण्यात आले आहे. कॉलेजियमची बैठक 11 नोव्हेंबरला झाली. ज्यामध्ये सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला सौरभ कृपाल यांच्या न्यायाधीशपदी नियुक्तीबाबत मत स्पष्ट करण्यास सांगितले होते.
सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर (कायदा) पदवी मिळविली. त्यांनी दोन दशके सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. त्याचबरोबर त्यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघासोबतही काम केले आहे. कलम 377 हटवण्यासाठी याचिकाकर्त्याचे ते वकील होते. सप्टेंबर 2018 मध्ये कलम 377 बाबतचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.