Homeराजकारणकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेस जोडीमारो आंदोलन, पटोलेंना अटक करून कठोर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेस जोडीमारो आंदोलन, पटोलेंना अटक करून कठोर कारवाईची भाजपची मागणी

advertisement

अहमदनगर दि.१८ जानेवारी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहे .नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालया समोर नाना पटोले यांच्या छायाचित्राला जोडे  मारत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध शहर भजाप तर्फे करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवणे शक्य नसल्याने आता त्यांच्या विरोधात असे वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य करणे विरोधकांनी सुरू केल असल्याचं आरोप भाजप तर्फे करण्यात आला आहे.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अटक करून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, तुषार पोटे, महेश नामदे,वसंत राठोड, अजय चितळे, दादासाहेब बोठे, शिवाजी दहीहंडे,यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular