अहमदनगर दि.२६ मार्च
१२ मार्च रोजी रस्त्यवरील पथविक्रेत्यांचे आणि सो अँड सो दुकान चालक केतन मुथा यांचे वाद झाले होते काही काळ बाजार पेठ बंद करण्यात आली होती त्या नंतर पाथविक्रेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्या वेळी आमदार संग्राम जगताप यांच्या सह शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांनी कापड बाजारात येऊन व्यापाऱ्यांच्या बाजूने उभा राहीले होते.
तर महापालिकेने दोन दिवस जुजबी कारवाई करत अतिक्रमण काढले होते मात्र आता पुन्हा अतिक्रमण झाले असून त्याचा त्रास व्यापाऱ्यांसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होत आहे या अतिक्रमणामुळे बाजार पेठ उध्वस्त होण्याची भीती असल्याने हा प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यासाठी येत्या मंगळावर पासून व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
या पत्रकार परिषदेस ईश्वर बोरा ,वसंत लोढा, ओमप्रकाश बायड ,केतन मुठ्ठा प्रतीक बोगवत हितेश ओबेराय कुणाल नारंग आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.