Homeविशेषकुत्री आपल्या पिल्लासाठी भक्ष शोधायला गेली आणि भलत्याच संकटात अडकून पडली.माजी नगरसेवक...

कुत्री आपल्या पिल्लासाठी भक्ष शोधायला गेली आणि भलत्याच संकटात अडकून पडली.माजी नगरसेवक निखिल वारे आणि प्राणी मित्रांनी केली अखेर या संकटातून सुटका

advertisement

अहमदनगर दि.१२ डिसेंबर-

पाईप लाईन परिसरातील एका भागात एक भटकी कुत्री प्लास्टिकची बरणी अडकून पडलेल्या अवस्थेत फिरत असल्याचं या परिसरातील जागरूक नागरिक राजेंद्र गर्गे यांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी तात्काळ या प्रभागाचे माजी नगरसेवक निखिल वारे यांना कळवले त्या कुत्रीला लहान पिल्लं असून दोन दिवसांपासून ती कुत्री अशाच अवस्थेत फिरत असल्याने पिल्लं आणि ती उपाशी असतील अशी माहीती आजूबाजूच्या नागरिकांनी दिली

.निखिल वारे यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत प्राणी मित्र हर्षद कटारिया आणि संकेत भापकर यांना संपर्क करून मनपा कर्मचारी आणि प्राणी मित्र संघटनेचे हर्षद कटारिया आणि संकेत भापकर यांनी एकत्रित दोन तासाच्या अथक प्रयत्ना नंतर त्या कुत्रीचे तोंडात अडकलेली प्लास्टिक बरणी काढण्यात यशस्वी झाले.बरणी काढल्या नंतर तिला पाणी पाजून खाऊ घालून सोडून देण्यात आले आणि ती कुत्री अखेर आपल्या पिल्लां जवळ गेली. या परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्यासह प्राणीमित्रांचे आभार मानले आहे. नागरिकांचे काम करत असतानाच प्राण्यांवर आलेल्या संकटुन बाहेर काढण्यासाठी धावून येणारा असा नगरसेवक क्वचितच पाहायला मिळतो अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा👇

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular