Homeराजकारणकेडगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे - आमदार संग्राम जगताप

केडगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे – आमदार संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि २० फेब्रुवारी
केडगाव येथील मोहिनीनगर मध्ये शिक्षक कॉलनी येथे आमदार निधीतून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.
केडगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. केडगाव उपनगरात विविध विकास कामांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होत असल्यामुळे नागरीवसाहती या भागात झपाट्याने वाढत आहेत. नगरसेवक मनोज कोतकर यांनी विकासासाठी सतत पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध करून घेतला आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

अहमदनगर मधील जुन्या शहरासह शहराच्या बाहेर नवीन उपनगर वाढत असताना तेथील विकास करणे आपले कर्तव्य असल्याने लवकरच संपूर्ण नगर शहराचा कायापालट झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल काही मोठी काम प्रगतिपथावर असल्याने सध्या नागरिकांना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र सर्व अडचणी काही दिवसात दूर होऊन शहराचा कायापालट झाल्याचं दिसून येईल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर,नगरसेवक राहुल कांबळे, गणेश नन्नवरे,विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,स्थायी समिती सभापती अविनाश घुले,नगरसेवक प्रकाश भागानगरे,संभाजी पवार,नगरसेवक समद खान,अजित कोतकर,बच्चन कोतकर,भैरू कोतकर,लक्ष्मीकांत घोडके,आप्पासाहेब कुलट,सचिन भोसले,राहुल डागा,अशोक गदादे, अशोक तांबे,छाया कुलट,स्मिता घोडके,श्रद्धा रानडे,श्याम कोतकर, संजय काळे,शरद खरात, डॉ.दगडे, माऊली साळुंके, अजय औशिकर,माधुरी गुंजाळ,छाया सुंबे,सुनीता काळे आदी यावेळी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular