अहमदनगर दि २४ फेब्रुवारी
अहमदनगर शहराची लोकसंख्या वाढत असून शहरासह उपनागरामधील लोकवस्त्या वाढत आहेत केडगाव परिसरही मोठ्या प्रमाणावर विस्तरला असल्याने
केडगाव उपनागरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.
याबाबत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप पाठपुरावा करत आहेत. आता केडगाव पोलीस स्टेशनचा प्रस्ताव सरकारी पातळीवर तहसील कार्यालयात असून तेथून तो प्रांत कार्यालयाकडे जाणार आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर त्या प्रस्तावाचा पुढील प्रवास सुरू होईल केडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण २२ गावे समाविष्ट करण्यात आली असून या सर्व गावातील ग्रामसभेने २६ जानेवारी रोजी केडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत समावेश व्हावा असा ठरवा करून दिलेला आहे तसेच महानगरपालिकेने सुद्धा याबाबत सहमती दर्शवली असून त्याबाबतचे पत्रही महानगरपालिकेने पोलीस प्रशासनाला दिलेले आहे.
त्यामुळे आता या प्रस्तावाचा प्रवास लवकरात लवकर व्हावा अशी इच्छा केडगाव मधील आणि केडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत समाविष्ट होणाऱ्या गावांमधील ग्रामस्थांची आहे
पाहुयात केडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणकोणती गावे समाविष्ट होणार आहेत
केडगांव ,रेल्वे स्टेशन,व्हीआरडी, परिसर,बुरडगांव,अरणगांव,खंडाळा
खडकी,जाधववाडी,सारोळा कासार,घोसपूरी,बाबूर्डी बेंद,अकोळनेर,भोरवाडी,कामरगाव,पिपळगांव कौडा,भोईरेपठार,भोईरे खुर्द,पिपळगांववाघा,
चास,सानवाडी,हिवरे बाजार, नेप्ती,निमगांव वाघा,जखनगांव,खातगांव,
“मात्र केडगाव पोलीस स्टेशनला स्वतंत्र पोलिस स्टेशनचे मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनला जागा कुठे द्यायची तसेच नवीन इमारत बांधणे आणि या ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांची पूर्तता करणे हे पुढील मोठे जिकरीचे काम आहे त्यामुळे पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांना याबाबत पाठपुरावा करावा लागणार आहे. कारण पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी पोलीस स्टेशन मंजूर होऊनही अद्याप याठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण झालेले नाही त्याचे कारण म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इमारत”