Homeजिल्हाकेडगाव येथील शिवसैनीकांचे दुहेरी हत्याकांड प्रकरण तापस करणाऱ्या सि.आय.डी. अधिकाऱ्यांनी आरोपीशी हातमिळवणी...

केडगाव येथील शिवसैनीकांचे दुहेरी हत्याकांड प्रकरण तापस करणाऱ्या सि.आय.डी. अधिकाऱ्यांनी आरोपीशी हातमिळवणी केल्याचा आरोप तापस सीआयडी कडून काढून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखे कडे द्यावा मागणी साठी कोतकर,ठुबे कुटुंबियांचे मुंबई येथे उपोषण सुरू

advertisement

अहमदनगर दि.२२ मार्च

अहमदनगर शहरातील गाजलेले केडगाव येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड प्रकरणात एक नवीन वळण आले असून  या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच हा तपास सीआयडी कडून काढून घेऊन अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा या प्रकरणात विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी संग्राम संजय कोतकर,प्रमोद आनंदा ठुबे,अमोल शिवाजी येवले,अनिता वसंत ठुबे,डॉ. श्रीकांत चेमटे,किरण रमेश ठुबे,गणेश रंगनाथ कापसे,देविदास भानुदास मोढवे,सुनिता संजय कोतकर यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे.

केडगाव  पोट निवडणुकीदरम्यान निवडणूक निकालानंतर शिवसेना अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री उडाली होती यामध्ये शिवसेनेच्या दोन उपशहर प्रमुखांची हत्या करण्यात आली होती हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले होते  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर मध्ये येऊन ठुबे आणि कोतकर कुटुंबीयांचे सांत्वन केले होते दोन शिवसैनिकांच्या हत्येला जवणार असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई होईल असे आश्वासनही त्यावेळी शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी दिले होते कालांतराने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी होऊन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महा विकास आघाडी सरकार स्थापन झाले  शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करणारे कार्यकर्ते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षशी संबंधित असल्याने हे प्रकरण शांत झाल्याचं दिसून येत होतं.

केडगाव हत्याकांडानंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता मात्र आता सीआयडीच्या अधिकाऱ्यांवरच कोतकर आणि ठुबे कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून सीआयडी चे अधिकारी अरुणकुमार सपकाळ आणि दिनेश कुमार पाटील, वैशाली माने व सस्ते या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास पुणे सि. आय.डी. कडे गेल्यानंतर तपासी अधिकारी अरुणकुमार सपकाळ व दिनेशकुमार पाटील व सस्ते यांनी आजपर्यंत कुठलीही कायदेशीर कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक घोटाळा झालेबाबतचा संशय संग्राम कोतकर यांनी व्यक्त केला असुन. गुन्हे अन्वेषण विभाग (सि.आय.डी. पुणे) यांच्या कडून न्याय मिळणार नाही अशी खात्री झाल्याने तसेच सि. आय.डी. पुणे यांनी  या प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्या मुळे तसेच आरोपीशी आर्थिक संधान साधल्याने सि. आय.डी. चे अधिकारी सपकाळ, पाटील व सस्ते हे माझे व माझे परिवाराचा आरोपीशी आर्थिक हातमिळवणी करुन आमच्या कुटुंबियांचा , माझा खून करतील अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणातील फरारी आरोपी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळेस सि. आय. डी. चे तपासी अधिकारी अरुणकुमार बबननराव सपकाळ यांनी दिनांक ७/४/२०२१ ला खोटे प्रतिज्ञापत्रक व म्हणणे सादर केले आहे” तसेच तपासी अधिकारी दिनेशकुमार भिमराव पाटील यांनी दिनांक ४/१०/२०२१ ला खोटे प्रतिज्ञापत्रक व म्हणणे सादर केलेले आहे कि “सुवर्णा संदिप कोतकर हिचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केलेले आहे व तपासकामी तिची पोलीस कस्टडीची आम्हाला काहीही गरज नाही’ असे अरुणकुमार सपकाळ आणि दिनेशकुमार पाटील यांनी खोटे प्रतिज्ञापत्रकासह म्हणणे सादर केले असल्याचा आरोप कोतकर आणि ठुबे कुटुंबीयांनी केला आहे.

त्यामुळे या प्रकरणात ीआयडी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी आणि या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून  काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा तसेच सरकारी वकील नेमण्यात यावा या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर कोतकर आणि दुबे कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular