Homeशहरकेडगाव हत्याकांड प्रकरण ठुबे,कोतकर कुटुंबियांचे उपोषण सुटले उपसभापती नीलम गोऱ्हे यांची शिष्टाई...

केडगाव हत्याकांड प्रकरण ठुबे,कोतकर कुटुंबियांचे उपोषण सुटले उपसभापती नीलम गोऱ्हे यांची शिष्टाई अली कामी

advertisement

अहमदनगर दि.२३ ₹ केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सी आय डी कडून काढून घेऊन नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवावा सुथो तसेच तपास करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी आशा विविध मगाण्यांकरीता मुंबई येथील आझाद मैदानावर संग्राम संजय कोतकर,प्रमोद आनंदा ठुबे,अमोल शिवाजी येवले,अनिता वसंत ठुबे,डॉ. श्रीकांत चेमटे,किरण रमेश ठुबे,गणेश रंगनाथ कापसे,देविदास भानुदास मोढवे,सुनिता संजय कोतकर मंगळवार पासून उपोषणाला बसले होते.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपोषणकर्ते संग्राम कोतकर प्रमोद ठोंबरे अमोल येवले यांच्याशी विधान भवन येथे चर्चा करून या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची केडगाव हत्याकांड प्रकरणात नियुक्ती करण्यात येइल तसेच सध्या जे तपास अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत त्यांच्या जागी नव्याने दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल तसेच न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आरोपींवर पोलीस कारवाई करतील असे आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेतले असल्याची माहिती संग्राम कोतकर यांनी दिली आहे.

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यात आसना शिवसैनिकांच्या हत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मागण्यासाठी उपोषणास बसावे लागते ही मोठी खेदाची बाब असून स्थानिक स्तरावर या प्रकरणाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे मात्र थेट मुंबई येथे जाऊन न्याय मिळण्यासाठी ठुबे आणि कोतकर कुटुंबियांना उपोषण करावे लागले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular