अहमदनगर दि २० फेब्रुवारी
फंड पे च्या नावाखाली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून साडे सात कोटींना गंडा घालून पाळलेल्या सोमनाथ राऊतला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली} पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,पोहेकॉ / दत्तात्रय जपे, पोना / अविनाश वाकचौरे, पोना / सुरज वाबळे, पोना / शैलेश गोमसाळे, आदींनी ही कामगिरी केलीय.
सोमनाथ राऊत याने २०१९ मध्ये बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून ‘फ़ंड पे’ नावाचे वॉलेट सुरू केले होते. या कंपनीच्या माध्यमातून पतसंस्था,मोबाईल रीचार्ज, विविध कंपन्या यांचे ऑनलाईन बिल पेमेंट, आर्टिजीएस,एन एफ टी बिल देण्याची सेवा देण्याचे काम कंपनी मार्फत सुरू होते. या कंपनीत१ लाख रकमेची गुंतवणूक केल्यानंतर ३०० ते १५०० प्रतिदिन कमिशन देण्यात येत असल्याने या आमिषाला बळी पडून अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती.सोलापूर, सांगली, कोल्हापूर, बीड , नागपूर, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद, मुंबई, पुणे, अशा राज्यभर गुंतवणूकदारांचे जाळे या कंपनीच्या माध्यमातून राऊतने पसरवले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील सतीश बाबुराव खोडवे यांनी सोमनाथ राऊत याच्याविरुद्ध आणि त्याच्या साथीदारांनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते.
या प्रकरणात सोनाथ राऊतसह वंदना पालवे (केडगाव) सुप्रिया आरेकर (बुऱ्हाणनगर) प्रितम शिंदे (पुणे)प्रीती शिंदे (दिल्लीगेट) शॉलमन गायकवाड (पाईपलाईन रोड) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा ३ तसेच फसवणूक,फडवणुकीला सहकार्य करणे. या आरोपा खाली ४२०,३४ या कलमन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सोमनाथ राऊत हा त्याची पत्नी सोनिया सोमनाथ राऊत जबरदस्त सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे सर्व आरोपी अद्यापही फरार आहेत.