अहमदनगर दि.१८ डिसेंबर सुथो
अहमदनगर कोतवाली पोलीस ठाणे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बायोडिझेल प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याकडे देण्यात आला होता त्यानंतर या प्रकरणी मोठे राजकीय नेते आरोपी झाल्याने ते प्रकरण चांगलेच तापले होते. दोन दिवसापूर्वी या प्रकरणातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा व्हिडिओ नेमका कशाचा आहे याबाबत अद्यापही कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र यानंतर कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक (डीबी) बरखास्त केले आहे.जे कोणी कर्मचारी चांगली कामगिरी करतील त्यांनाच पुढील काळात गुन्हे शोध पथकात संधी देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली आहे.सुथो