अहमदनगर दि ६ मार्च
अहमदनगर अहमदनगर शहरातील नागरिक सध्या रस्त्यांमुळे परेशान झाले आहेत त्याच प्रकारे आता शहरातील अतिक्रमणामुळे नागरिक बेजार झाले आहेत.
शहरातील एकही असा रस्ता नाही तेथे महानगर पालिकेच्या जागेवर अतिक्रमण झालेले नाही कापड बाजार,दिल्लीगेट चितळे रोड, चौपाटी कारंजा,एसटी स्टँड समोरील रस्ते, उपनगरांमधील प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, श्रीराम चौक, एकवीरा चौक या ठिकाणी टपाऱ्यांचे साम्राज्य उभे राहिलेले आहे.
आणि हे सर्व साम्राज्य महानगरपालिकेच्या जागेवर उभे राहिले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे विशेष म्हणजे रस्त्याच्याकडेला टपरी उभी करणे त्यानंतर तिथे येणाऱ्या ग्राहकाची पार्किंग आणि त्यानंतर उरलासुरला रस्ता वाहतूकीसाठी खुला राहतो त्यामुळे अतिक्रमण धारकांचा रुबाब या ठिकाणी पाहायला मिळतो या अतिक्रमणामुळे रस्ते छोटे होत आहेत आधीच खड्ड्याने त्रस्त झालेल्या नागरकरांना या अतिक्रमणा मुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो मात्र महानगर पालिकेचा अतिक्रमण विभाग झोपला आहे की झोपेचे सोंग घेतोय हे समजायला तयार नाही.
चार दिवसांपूर्वी उपनागरामधील गंगा उद्यान ते तारकपूर या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत असताना रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभा केलेल्या टपरी धारकांच्या विरोधामुळे ठेकेदाराला काम थांबवण्याची वेळ आली
तर तोफखाना पोलीस स्टेशन ते बेहस्तबाग महाला पर्यंतच्या रोड वरील मोठं मोठी अतिक्रमणे पाडली गेली मात्र काही ठरावीक टपाऱ्यांची अतिक्रमणे जैसे थे असून महापालिकेतील एका लोकसेवकाचा हात या अतिक्रमण धारकांवरत असल्याचं बोलले जातंय.
हातावर पोट असलेले लोक अतिक्रमण करून आपला व्यवसाय करत असतात त्याला विरोध नाही मात्र हे अतिक्रमण करताना आपण नागरिकांना त्रास होईल असे वागू नये हीच नागरिकांची अपेक्षा आहे. संपूर्ण रस्ताच आपल्या घरच्या मालकीचा असल्याचे अतिक्रमण धारकांची धारणा असल्यामुळे शहरात अतिक्रमण धारकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे जर वेळेवरच ही समस्या सोडली नाही तर भविष्यात महानगरपालिकेला आणि नागरिकांना अतिक्रमणाचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
अहमदनगर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग प्रमुख कोण आहे याची माहिती अनेक नागरकरांना नाही अनेक दिवसांपासून अतिक्रमण पथक शहरातील रस्त्यांवर दिसली नाही त्यामुळे अतिक्रमणे पथक आहे का बरखास्त केले याची चर्चाही सध्या नगर शहरात सुरू आहे.